Spread the love

भाजप रावेर उत्तर व दक्षिण मंडळाची विशेष संघटनात्मक बैठक संपन्न

तिरंगा रॅली, SIR आढावा, बूथनिहाय नियोजनासह आगामी संघटनात्मक उपक्रमांवर चर्चा

रावेर प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या वतीने विशेष संघटनात्मक व मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, तिरंगा रॅली तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी १५ ऑगस्ट ‘अखंड भारत संकल्प दिना’निमित्त रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन व तयारीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत SIR आढावा बैठक, बूथ व शक्ती केंद्र स्तरावरील जबाबदाऱ्यांचे नियोजन, आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावरही चर्चा झाली. यासोबतच रावेर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

बैठकीला भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, प्रदेश सदस्य सुरेश धनके, मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटीलअॅड. सूर्यकांत देशमुख यांच्यासह रावेर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तालुका कार्यकारिणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, BLA-2, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version