Spread the love

भूषण महाजन यांची पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान; पत्रकार संघटनेच्या कार्याचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या हस्ते, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भूषण महाजन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

भूषण महाजन हे गेल्या दशकभरापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. पत्रकारांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने व उपक्रम राबविण्यासह संघटनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच संघटनेचे कार्य जिल्ह्याच्या विविध भागांत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुराव्याचा निर्धार

भूषण महाजन यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने पुन्हा एकदा त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. आगामी काळात पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विविध क्षेत्रांतून अभिनंदन

भूषण महाजन यांच्या पुनर्नियुक्तीचे पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात आले. विविध मान्यवर, पत्रकार बांधव आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version