Spread the love

जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचा २२ ते २४ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौरा

पश्चिम जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी संवाद; संघटन बळकटीकरणासह पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर चर्चा

जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे हे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या सूचनेनुसार दि. २२ ते २४ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधून अनुसूचित जाती विभागाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

या दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे तसेच माजी प्रदेश सचिव अनिरुद्ध सावळे हे ॲड. अंकुश कटारे यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्यादरम्यान जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांच्या निवडीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळातील कार्यक्रम व उपक्रमांबाबतही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक

दि. २२ ऑगस्ट :

  • चाळीसगाव – सकाळी १० वाजता

  • भडगाव – दुपारी २ वाजता

  • एरंडोल – सायंकाळी ५ वाजता

दि. २३ ऑगस्ट :

  • अमळनेर – सकाळी १० वाजता

  • धरणगाव – दुपारी २ वाजता

  • पारोळा – सायंकाळी ५ वाजता

दि. २४ ऑगस्ट :

  • पाचोरा – सकाळी १० वाजता

  • जळगाव ग्रामीण – सायंकाळी ५ वाजता

या दौऱ्यात काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनात्मक चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी केले आहे.

यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख व प्रदीप सोनवणे यांनी प्रसिद्ध केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version