पहाणचे माजी सरपंच देविदास पाटील यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय भीमसेनेतर्फे अभिनंदन
विकास सोसायटीच्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी सर्वानुमते ठराव मंजूर; सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळण्याच्या अपेक्षा
जळगाव | प्रतिनिधी :
पहाण गावातील माजी सरपंच आप्पासो देविदास हरिदास पाटील यांची विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे, सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे देविदास पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याने त्यांच्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
देविदास पाटील यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा सहकार क्षेत्राला निश्चितच लाभ होईल. त्यांच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी प्रभावी कार्य घडावे तसेच सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळावी, अशा शुभेच्छा वाल्मिक जाधव यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल गावातील नागरिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
