Spread the love

गाढोदे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सहावे पुष्प संपन्न

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर ज्योतीताई भालेराव यांचे प्रभावी प्रबोधन; बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सहावे पुष्प गाढोदे (ता. जळगाव) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी केंद्रीय शिक्षिका आयु. नी. ज्योतीताई विलास भालेराव यांनी ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर सोप्या आणि प्रभावी भाषेत प्रबोधन केले.

प्रवचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या विचारांचा आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा आढावा घेण्यात आला. ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक समतेचा मार्ग स्वीकारून समाजाने प्रगती साधावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास आद. विद्याताई झनके (जिल्हा पर्यटन सचिव), आद. सुषमाताई इंगळे (जिल्हा कार्यालयीन सचिव), आयु. राजेश इंगळे (तालुका अध्यक्ष, जळगाव), आद. किरण सोनवणे (तालुका संस्कार सचिव), आद. गौतम सपकाळे (बौद्धाचार्य), आद. आधारअण्णा सपकाळे (माजी श्रामणेर), आद. समिंदर सपकाळे (माजी श्रामणेर), आद. संतोष सपकाळे (माजी श्रामणेर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाढोदे महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षा आद. कविताताई सपकाळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाला गाढोदे तसेच परिसरातील श्रद्धाशील बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित या धम्म प्रवचन मालिकेतून समाजात धम्मविचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम सपकाळे यांनी केले, तर आभार आयु. नी. कविताताई सपकाळे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version