Spread the love

सचिन तायडे यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या सावदा शहराध्यक्षपदी नियुक्ती

सामाजिक न्यायासाठी संघर्षाची जबाबदारी; संघटना मजबूत करण्याचे आवाहन

सावदा | प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत आयु. सचिन तायडे यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या सावदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

नियुक्तीपत्रात तायडे यांनी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, मुस्लिम आणि बहुजन समाजातील घटकांच्या न्याय व हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेत लोकशाही व संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दलित अत्याचार, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरोधात सातत्याने आवाज उठवून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तायडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शहर, तालुका आणि गाव पातळीवर संघटनेची बांधणी अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना संघटित करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत संघटनेचे ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षाही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याच्या भूमिकेतून तायडे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version