रावेरच्या वैशाली हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलगी आढळली; पोलिसांची कारवाई
ओळखपत्र न तपासता व लॉजिंग रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम दिल्याचा आरोप; मॅनेजरसह दोघे अटकेत
रावेर | प्रतिनिधी : अक्षय वाघ
रावेर शहरातील सावदा रोडवरील वैशाली हॉटेल व लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या २३ वर्षीय तरुणासह हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलगी व २३ वर्षीय तरुणाला कोणतेही ओळखपत्र न तपासता तसेच लॉजिंग रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद न करता रूम उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी संबंधित तरुण आणि हॉटेल मॅनेजरविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेमुळे रावेर शहरातील लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची ओळख पडताळणी आणि आवश्यक नोंदी केल्या जातात का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासातून या प्रकरणातील अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.
