Spread the love

नालंदा बुद्ध विहारात वर्षावास धम्म प्रवचनाचे आठवे पुष्प संपन्न

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीलढे’ विषयावर बाबूराव वाघ यांचे प्रभावी प्रबोधन; बोधीवृक्ष लागवडीने दिला धम्म व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शिरसोली, ता. जळगाव :
नालंदा बुद्ध विहार, जळके रोड, शिरसोली येथे भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाले.

या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक आयु. बाबूराव वाघ (जळगाव) यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीलढे’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची विविध पैलूंमधून माहिती देताना त्यांनी विषय अत्यंत सोप्या व समजेल अशा भाषेत मांडत उपस्थितांचे प्रबोधन केले.

मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमास आयु. डॉ. सचिन नरवाडे (जिल्हा संरक्षण सचिव), आद. ज्योतीताई भालेराव (केंद्रीय शिक्षिका), आद. सुषमाताई इंगळे (जिल्हा कार्यालयीन सचिव), आद. शीतलताई भगत, आयु. राजेश इंगळे (तालुका अध्यक्ष, जळगाव), आद. यशवंत जाधव (तालुका कोषाध्यक्ष), आद. अनिलदादा भगत, आद. शैलेश सोनवणे (तालुका संरक्षण सचिव), आद. सुनिल तायडे, आद. पंडित वानखेडे (तालुका पर्यटन सचिव) यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिरसोली ग्रामशाखेचे अध्यक्ष आद. सुनिल तायडे व त्यांची संपूर्ण कार्यकारणी तसेच परिसरातील श्रद्धाशील बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोधीवृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या मंगल प्रसंगी आद. डॉ. सचिन नरवाडे यांनी नालंदा बुद्ध विहार परिसरात लागवडीसाठी बोधीवृक्ष देऊन दान पारमिता पूर्ण केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोधीवृक्षाची लागवड करण्यात आली.

धम्मविचार आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सूत्रसंचालन व आभार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. पंडित वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. शैलेश सोनवणे यांनी मानले. उपासक-उपासिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्षावास प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प प्रेरणादायी आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version