Spread the love

श्री. गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी आर.एल. पाटील, उपमुख्याध्यापकपदी पी.एम. पाटील

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचा निर्णय; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पाचोरा : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे कार्यरत मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच रिक्त झालेल्या उपमुख्याध्यापकपदी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. पी.एम. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेचे चेअरमन मा. नानासो. श्री. संजय वाघ, व्हाइस चेअरमन मा. नानासो. श्री. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो. श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा. आण्णासो. श्री. वासुदेव महाजन तसेच संस्थेच्या सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्थितीत नवनियुक्त मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. संजय वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना, “श्री. आर.एल. पाटील यांनी उपमुख्याध्यापकपदावर कार्यरत असताना उत्कृष्ट कामकाज केले असून, विद्यालयाप्रती असलेली त्यांची आस्था व योगदान लक्षात घेऊन त्यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती करण्यात आली आहे,” असे सांगून त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. अण्णासो. श्री. दगाजी वाघ, मा. आप्पासो. श्री. सतीश चौधरी, मा. दादासो. श्री. योगेश पाटील, मा. बापूसो. श्री. प्रकाश पाटील, मा. दादासो. श्री. अर्जुनदास पंजाबी, मा. अण्णासाहेब श्री. मधुकर पाटील, मा. आबासो. श्री. एकनाथ महालपुरे तसेच नगरसेवक श्री. सुरज वाघ उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसो. श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासो. श्री. संजय वाघ, मानद सचिव मा. ॲड. श्री. महेश देशमुख, व्हाइस चेअरमन मा. नानासो. श्री. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो. श्री. खलिल देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा. आण्णासो. श्री. वासुदेव महाजन तसेच संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने नवनियुक्त मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील यांनी संस्थेने सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे व सुयोग्य पद्धतीने पार पाडत सर्वांच्या सहकार्याने विद्यालयाची अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. तसेच नवनियुक्त उपमुख्याध्यापक श्री. पी.एम. पाटील यांनी संस्थेचे आभार मानून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक श्री. आर.बी. बांठिया, श्री. एम.टी. कौंडिण्य, किमान कौशल्य विभागप्रमुख श्री. मनीष बाविस्कर, क्रीडा प्रमुख श्री. एस.पी. करंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. आर.बी. बोरसे, कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version