Spread the love

अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड बंदची हाक

सकल मातंग समाजाचे पोलिस ठाण्यात निवेदन; संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी

प्रतिनिधी | बोदवड : बोदवड तहसील कार्यालयासमोर १ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान मातंग समाजाबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत सकल मातंग समाजाच्या वतीने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी बोदवड शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

यासंदर्भात सकल मातंग समाज, बोदवड यांच्या वतीने बोदवड पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, तहसील कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान तालुक्याबाहेरील काही व्यक्तींनी मातंग समाजाविषयी आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे भाष्य करण्यात आल्याने समाजबांधवांसह नागरिकांच्या भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ ३ सप्टेंबर रोजी बोदवड शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदची पूर्वसूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आली असून, १ सप्टेंबर रोजी झालेल्या कथित वक्तव्याची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत प्रशासनाने या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version