Spread the love

बदलापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारक परिसरात ‘प्रबोधन कट्टा’ या उपक्रमाचे लोकार्पण नुकतेच नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित परदेशी नोकरी व शिक्षण संधी मार्गदर्शन शिबिराला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी बोलताना नगराध्यक्षा घोरपडे यांनी बदलापूरच्या जनतेचे आभार मानत शहरातील विकासकामांबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविणे, ‘बालकन्या योजना’ राबविणे तसेच महिलांसाठी संस्कार केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ‘प्रबोधन कट्टा’ ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून याला पूर्ण सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपक्रमाचे प्रणेते राजाराम खरात यांनी प्रास्ताविकात ‘प्रबोधन कट्टा’चे महत्त्व अधोरेखित करत समाजप्रबोधनासाठी अशा व्यासपीठांची गरज व्यक्त केली.

प्रा. योगेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. साहित्यिक प्रा. अनिल भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर भाष्य करत समाजाने शिक्षण, संघटन व संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली.

तसेच भूषण रामटेके यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधी, परदेशी शिक्षण, स्कॉलरशिप मिळवण्याचे मार्ग याबाबत सविस्तर माहिती दिली. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल शिर्के यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला सदस्य आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमास यांचे सहकार्य
सदर कार्यक्रमास मा. अशोक गजरमल , सुभाष रणपिसे पांडुरंग वावळ, प्रा. योगेश साळवे, प्रा अनिल भालेराव, मिलिंद सकपाळ, बाळासाहेब पगारे, प्रसेनजीत सोनवणे, नारायण अभंग, वामन पठारे, विजय जगताप, विठ्ठल सोनवणे, रावसाहेब शिंदे, शांतू डोळस, महेंद्र कांबळे, रावसाहेब घनघाव, ए.जी. पवार साहेब तसेच सुबोध जयस्वाल, भास्कर सोनवणे, कृष्णा घाडगे, तसेच उत्कर्ष मित्र मंडळ, बेलवली. येथील श्री विशाल वारे ,सौरव गोतपागर, तसेच शिवाजी भगत, अभिजीत धुरत, स्वप्निल भाऊ शिर्के, संपत कांबळे,‌ दीपक आल्हाट, तसेच महिला सदस्य अर्चना साळवे, छायाताई अभंग, विद्याताई कसबे, सुमित्रा ताई सरतापे, कमलताई गजरमल, सावित्रीबाई गाडे, भावनाताई सकपाळ व त्यांच्या सहकारी यांचे सदर कार्यक्रमास सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version