Spread the love

पाळधीत श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजन; नाभिक समाज बांधवांची उपस्थिती

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) : पाळधी येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सत्यनारायण पूजन नवदांपत्य मुकेश फुलपगार व सौ. धनश्री फुलपगार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला खोंडे बंधू ज्वेलर्सचे संतोष खोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाज मंडळाचे गोपाल सोनवणे, स्वप्नील फुलपगार, मुकेश फुलपगार, सोनू फुलपगार, संदीप फुलपगार, गणेश फुलपगार, नितीन फुलपगार, आत्माराम फुलपगार, गोविंद फुलपगार, सुभाष श्रीखंडे, गोपाल फुलपगार, प्रकाश श्रीखंडे, अशोक श्रीखंडे, गुलाब सोनवणे, किरण पगारे, संदीप श्रीखंडे, लक्ष्मण कुवर, कैलास फुलपगार, विनोद फुलपगार, तुषार फुलपगार, पंकज फुलपगार, मंगेश फुलपगार, प्रद्युम फुलपगार, मिलिंद फुलपगार, जितेंद्र फुलपगार, आदित्य फुलपगार, छकुला फुलपगार यांच्यासह समाजबांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संत सेना महाराजांच्या विचारांना अभिवादन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version