Spread the love

शिवनेरी मित्रमंडळाचा मंडप भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न

गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात; मंडळाचे १९व्या वर्षात दिमाखात पदार्पण

धुळे : प्रतिनिधी

येथील शिवनेरी मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेला मंडप भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. मंडळाचे हे १९ वे वर्ष असून, या निमित्ताने आयोजित पूजनास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

शास्त्रोक्त मंत्रोच्चारात मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख न्हानूभाऊ परदेशी आणि सुप्रसिद्ध डॉ. विनोदजी छाजेड,विजय चिंचोले, यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून आणि श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी शिवनेरी मित्रमंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. गेली १८वर्षे अविरतपणे लोकसेवेचा आणि उत्सवप्रियतेचा वारसा जपणारे हे मंडळ १९व्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल सर्वांनी मंडळाचे कौतुक करून गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे यावर्षी चे अध्यक्ष शुभम कुटे,सोमेश कानकाटे,हितेश साळुंखे,जयेश फुलपगारे, संकेत कोठावदे,गौरव पाटील,प्रेम कानकाटे,जयेश नाईक,अमोल शिंदे,हितेश साळुंखे,प्रणित पाटील,ओम् कानकाटे, गोपाल चव्हाण,जयेश मुसळे,दक्ष प्रजापत,आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवनेरी मित्रमंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे कौतुक केले. गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे सामाजिक कार्य आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारे मंडळ आता १९व्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल उपस्थितांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष शुभम कुटे, सोमेश कानकाटे, हितेश साळुंखे, जयेश फुलपगारे, संकेत कोठावदे, गौरव पाटील, प्रेम कानकाटे, जयेश नाईक, अमोल शिंदे, प्रणित पाटील, ओम् कानकाटे, गोपाल चव्हाण, जयेश मुसळे, दक्ष प्रजापत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडप भूमिपूजन सोहळ्यामुळे शिवनेरी मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, यंदाचा उत्सवही उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version