Spread the love

वाळकीतील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पक्षप्रवेश

आमदार सोनवणे यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त; गावाच्या भविष्यातील विकासासाठी युवकांची शिवसेनेला साथ

चोपडा प्रतिनिधी – राहुल पाटील : चोपडा तालुक्यातील वाळकी गावातील असंख्य युवकांनी आमदार प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे आणि लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या युवकांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या युवकांनी वाळकी गावात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच भविष्यातही विकासकामे सुरू राहावीत, या अपेक्षेने युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.

विकासकामांवर विश्वास व्यक्त

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वाळकी गावातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर पक्षाला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

गावाच्या विकासासाठी युवकांनी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात गावातील विविध प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून सक्रिय भूमिका घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या युवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये हर्षल पाटील, कुणाल पाटील, कुणाल सुनील पाटील, प्रेम बाविस्कर, तेजस कोळी, गणेश दिवर, नयन पाटील, रोहित दिवर, हर्षल कोळी, वैभव पाटील, पंकज पाटील, समाधान दिवर आणि देवेश पाटील यांच्यासह अनेक युवकांचा समावेश आहे.

वाळकीतील युवकांच्या या पक्षप्रवेशामुळे चोपडा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version