Spread the love

धुळे सुपुत्राची मुंबईत गरुड भरारी; पोस्टमन ते पोस्टल असिस्टंट

मेहनत, जिद्द आणि विभागीय परीक्षेतील यशाच्या जोरावर रोहित वाडेकर यांची पदोन्नती

धुळे / मुंबई (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्याचे सुपुत्र रोहित अशोक वाडेकर यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विलेपार्ले पश्चिम येथे पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना त्यांनी विभागीय परीक्षा (LDCE) मध्ये यश मिळवत पोस्टल असिस्टंट (Postal Assistant) पदावर पदोन्नती मिळवली आहे.

मूळचे धुळे येथील असलेले रोहित वाडेकर यांनी आपल्या नोकरीच्या प्रवासाची सुरुवात पोस्टमन या पदापासून केली. फिल्डमध्ये प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधत सेवा बजावत असताना त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात पुढे जाण्याचे ध्येय ठेवले. त्यासाठी विभागीय परीक्षेची तयारी करत त्यांनी यश संपादन केले.

फिल्डमधून प्रशासकीय कार्यालयात भरारी

पोस्टमनसारख्या फिल्डच्या नोकरीतून मुंबईतील रिजनल ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट म्हणून जबाबदारी स्वीकारणे, ही त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची पावती मानली जात आहे.

नोकरी सांभाळत अभ्यास करून विभागीय परीक्षेत यश मिळविणे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने प्रयत्न केल्यास प्रगतीची नवी दारे खुली होऊ शकतात, हे वाडेकर यांच्या प्रवासातून दिसून येते.

पोस्टल परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

रोहित वाडेकर यांच्या पदोन्नतीबद्दल धुळे आणि मुंबईतील पोस्टल परिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे जवळचे मित्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक श्री. विजयकुमार पाटील यांनी वाडेकर यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

रोहित वाडेकर यांच्या या यशामुळे धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या संघर्षमय प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.

शुभेच्छुक : श्री. विजयकुमार पाटील, शिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका

Share.
Leave A Reply

Exit mobile version