Spread the love

बाहेरपुरात मानाच्या गणपती बाप्पाचे दिमाखदार आगमन!

ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी अन् गणेशभक्तांचा जल्लोष; नगरसेवक छोटू भाऊ चौधरी व छोटू भाऊ गोहिल यांच्या संकल्पनेतून भव्य सोहळा

पाचोरा : बाहेरपुरा येथील मानाच्या गणपती बाप्पाचे यंदाचे आगमन अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय वातावरणात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि हजारो गणेशभक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः गणेशमय झाला होता.

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक तसेच बाहेरपुराची आन-बान-शान म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक छोटू भाऊ चौधरी आणि नगरसेवक छोटू भाऊ गोहिल यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वातून या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि गणरायावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने संपन्न झाले.

यावेळी पुष्पा आणि शेखावत साहेब यांच्या दमदार एन्ट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण पाचोरा परिसर अक्षरशः पुष्पमय झाला होता. ढोल-ताशांचा निनाद, आकर्षक सजावट, फुलांची उधळण आणि गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.

या मंगल प्रसंगी आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, नगरपालिका गटनेते सुमित दादा पाटील, नगरसेवक व शहर प्रमुख सुमित सावंत यांच्यासह बाहेरपुराचे लोकप्रिय नगरसेवक छोटू भाऊ चौधरी यांचे असंख्य कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेत हा भव्य सोहळा यशस्वी केला.

गणरायाच्या आगमनाने बाहेरपुरासह संपूर्ण पाचोरा शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. **“गणपती बाप्पा मोरया!”**च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

शेवटी गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना—
बाहेरपुरा, पाचोरा आणि संपूर्ण तालुक्यावर बाप्पाची कृपादृष्टी सदैव राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद नांदो!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Share.
Leave A Reply

Exit mobile version