Spread the love

नाहाटा महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा’वर विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

प्राचीन भारतातील ज्ञानस्रोत, शेती-व्यापार व शिक्षण व्यवस्थेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भुसावळ : प्रतिनिधी

नाहाटा महाविद्यालयात शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासाला महत्त्व देण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे अध्यक्षस्थानी होते. जामनेर महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. बी. डी. पाटील उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, डॉ. जी. आर. वाणी, स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन सेलचे समन्वयक डॉ. एस. के. राठोड तसेच IKS समन्वयक डॉ. पी. ए. अहिरे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. ए. अहिरे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. ममता पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन राजपूत यांनी करून दिला.

तीन सत्रांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यशाळेत तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात जामनेर महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विषयाचे प्रा. बी. डी. पाटील यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि प्राचीन भारतातील ज्ञानस्रोत’ या विषयावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील प्रा. डॉ. विवेक श्रावगे यांनी ‘प्राचीन भारतातील शेती व्यवस्था आणि व्यापार’ या विषयावर माहिती दिली. प्राचीन भारतातील कृषी पद्धती, व्यापार व्यवस्था आणि तत्कालीन आर्थिक जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.

तिसऱ्या सत्रात नाहाटा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पी. ए. अहिरे यांनी ‘प्राचीन भारतातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यापीठे’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती, विद्यापीठांची परंपरा आणि ज्ञाननिर्मितीच्या विविध प्रवाहांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

भारतीय ज्ञान परंपरा हा विषय F.Y. B.A., B.Com., B.Sc., BBA आणि BCA या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेतील विविध क्षेत्रांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

समारोपप्रसंगी सहकार्याबद्दल कौतुक

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेचे आभार प्रा. डॉ. ममता पाटील यांनी मानले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आर. एस. नाडेकर, डॉ. गौरी पाटील, डॉ. ममता पाटील, डॉ. व्ही. एन. महिरे, डॉ. संगीता भिरुड, डॉ. सचिन राजपूत, डॉ. हर्षल पाटील, डॉ. सचिन कोलते, डॉ. पी. एच. इंगोले, प्रा. स्वाती शेळके, डॉ. ए. डी. क्षीरसागर तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version