Spread the love

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची महाआरती

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी-प्रशासनाने समन्वयाने काम करावे : गिरीश महाजन

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेतील मानाच्या गणपतीचे शुक्रवारी रात्री ९ वाजता राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते विघ्नहर्त्या गणरायाची भावपूर्ण वातावरणात महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महाआरतीनंतर उपस्थितांना संबोधित करताना गिरीश महाजन म्हणाले की, महानगरपालिकेची गौरवशाली परंपरा यापुढेही कायम राहिली पाहिजे. शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय राखून काम करणे आवश्यक आहे. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर जळगावच्या खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक सुनील खडके, अरविंद देशमुख, सुरेश सोनवणे, विशाल भोळे, वैशाली पाटील, अंकिता पंकज पाटील, कविता सागर पाटील, मानसी भोईटे, अमर जैन, नरेंद्र आत्माराम पाटील, रिटा सपकाळे, जाकीर खान पठाण, रमेश मतानी, उज्वला बाविस्कर, रेश्मा काळे, माधुरी बारी, अनिता भापसे, अनिल अडकमोल, विजय बांदल, कविता शिवदे यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाआरतीनंतर उपस्थित नागरिकांनी मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. तसेच नागरिकांच्या सहकार्याने विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे महानगरपालिका परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version