Spread the love

कोल्हे हिल्समध्ये पर्वतकर कुटुंबीयांच्या घरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन

निलेशकुमार पर्वतकर यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण; आप्तेष्टांसह भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जळगाव (प्रतिनिधी) :

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात निलेशकुमार सुभाषचंद्र पर्वतकर यांच्या निवासस्थानी यंदाही मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात महालक्ष्मीचे आगमन झाले. या धार्मिक व मांगलिक प्रसंगी पर्वतकर कुटुंबातील नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

महालक्ष्मीच्या आगमनानंतर कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी भक्तिभावाने महालक्ष्मीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

या धार्मिक सोहळ्यामुळे पर्वतकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी दिवसभर भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नातेवाईक व आप्तेष्टांचे पर्वतकर कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महालक्ष्मी आगमनाच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्ट एकत्र आल्याने परस्पर स्नेह, श्रद्धा आणि कौटुंबिक एकोप्याचे दर्शन या सोहळ्यात घडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्वतकर परिवारासह नातेवाईक आणि आप्तेष्टांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version