Spread the love

आज दुपारी २ वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा

बोदवड | प्रतिनिधी सतिष बावस्कर : येवती, ता. बोदवड, जि. जळगाव येथील रहिवासी काशिनाथ मारुती बावस्कर यांचे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच येवती परिसरात शोककळा पसरली. काशिनाथ बावस्कर हे प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने येवती परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींना नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी उजाळा दिला.

त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन भाऊ तसेच ऐसिनाथ बावस्कर, जनार्धन बावस्कर यांच्यासह मोठा बावस्कर परिवार आहे.

आज अंत्ययात्रा

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता येवती येथील राहत्या घरून निघणार आहे. ईश्वर त्यांच्या  आत्म्यास चिरशांती देवो आणि बावस्कर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Share.
Leave A Reply

Exit mobile version