डॉ. प्रकाश वानखेडे यांच्या निवासस्थानी वर्षावास प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प संपन्न
‘महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास’ विषयावर प्रा. प्रितीलाल पवार यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प डॉ. प्रकाश वानखेडे यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी ‘महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास’ या विषयावर आयु. प्रा. प्रितीलाल पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. प्रितीलाल पवार यांनी आपल्या प्रवचनातून महाबोधी महाविहार आणि बोधीवृक्षाच्या इतिहासाचा विविध संदर्भांसह आढावा घेतला. महाबोधी महाविहार तसेच बोधीवृक्षाला इतिहासातील विविध कालखंडांत आलेल्या आव्हानांची, झालेल्या हानीची आणि त्यानंतर करण्यात आलेल्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. बौद्ध वारशाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यासाठी अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून विषय मांडण्यात आला.
या प्रवचन कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग आयु. रविंद्र वानखेडे, जिल्हा सचिव संस्कार विभाग आयु. भीमराव पवार, जिल्हा सचिव संरक्षण विभाग आयु. डॉ. सचिन नरवाडे, जिल्हा संघटक आद. बी. एस. पवार गुरुजी, आयु. सुभाष सपकाळे, आयु. बाबुराव वाघ, आयु. श्रीकांत बाविस्कर, आयु. गौतम वाकोडे, आयु. सोमा भालेराव, आयु. दिनकर सोनवणे, आयु. दिलीप सपकाळे, आयु. बोदडे, आयु. डी. आर. वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आयु. संतोष गायकवाड गुरुजी (बौद्धाचार्य), आद. ज्योतीताई भालेराव (केंद्रीय शिक्षिका), सरोजिनी लभाने ताई, तालुका अध्यक्ष आयु. राजेश इंगळे, तालुका सचिव आयु. किरण सोनवणे, आयु. जयपाल धुरंधर, आयु. किसन सपकाळे यांच्यासह परिसरातील श्रद्धाशील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राजेश इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी उपस्थितांसाठी डॉ. प्रकाश वानखेडे व वानखेडे ताई यांच्या वतीने अल्पोपहार आणि खीरदान करण्यात आले. उपस्थितांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
