Spread the love

दापोऱ्यात भक्तिरसाचा जागर!

स्व. नथ्थु ओंकार सोनवणे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळा

१ ऑक्टोबरला ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित यांच्या प्रभावी कीर्तनाने दापोरा नगरीत रंगणार भक्तिमय सोहळा

शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)

दापोरा, ता. जि. जळगाव : दापोरा नगरीत भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे. स्व. ह.भ.प. नथ्थु ओंकार सोनवणे (आण्णासाहेब) यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत हा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे.

या विशेष कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित, सोयगावकर, जि. संभाजीनगर हे आपल्या प्रभावी वाणीने कीर्तनसेवा बजावणार आहेत. त्यांच्या रसाळ आणि ओघवत्या कीर्तनातून संतपरंपरा, अध्यात्मिक विचार तसेच समाजप्रबोधनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दापोरा नगरीत भक्तिरसाची अनुभूती घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

स्व. नथ्थु ओंकार सोनवणे (आण्णासाहेब) यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. नरेंद्र नथ्यू सोनवणे, श्री. महेंद्र नथ्यू सोनवणे, श्री. शुभम नरेंद्र सोनवणे, तेजस महेंद्र सोनवणे आणि हर्षित महेंद्र सोनवणे यांच्या सहभागातून करण्यात आले आहे. तसेच विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ, दापोरा यांचे सहकार्य लाभणार आहे.

भाविकांना उपस्थितीचे आवाहन

या भक्तिमय कीर्तन सोहळ्यास दापोरा तसेच परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनसेवा, भक्तिरस आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : दापोरा, ता. जि. जळगाव
दिनांक : गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६
वेळ : रात्री ८ ते १० वाजता

भक्ती… श्रद्धा… प्रबोधन… आणि संतवाणीचा सुरेल संगम!

Share.
Leave A Reply

Exit mobile version