Spread the love

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला रामदास पाटील यांचा मदतीचा हात

शासनाच्या मदतीची प्रतीक्षा असताना किराणा, कपडे व मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली

बोदवड प्रतिनिधी : येवती येथील शेतकरी काशिनाथ मारोती बावस्कर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा आहे.

या परिस्थितीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पती रामदास पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत बावस्कर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. शासनाकडून आर्थिक मदत मिळेपर्यंत कुटुंबाला आवश्यक किराणा साहित्य व कपडे उपलब्ध करून देण्यासोबतच मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.

आर्थिक अडचणीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे कुटुंबाला दैनंदिन गरजा भागविण्यास तसेच मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यास आधार मिळणार आहे. संकटाच्या काळात पुढे येत बावस्कर कुटुंबाला मदत केल्याबद्दल रामदास पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने संबंधित प्रकरणाची नियमानुसार चौकशी करून पात्रतेनुसार मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version