‘मालक चहा’ कॉफी अँड शेक दालनाचा शुभारंभ!
आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; युवा उद्योजकांना व्यवसायासाठी शुभेच्छा
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पारोळा शहरातील बाजारपेठ परिसरातील मोहरीर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मालक चहा – Coffee & Shake’ या दालनाचा शुभारंभ आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
यावेळी आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांनी दालनाला भेट देत फीत कापून उद्घाटन केले. नव्या व्यवसायाची सुरुवात करणारे संचालक विकास भोई व शुभम राठोड यांचे अभिनंदन करून त्यांच्या व्यवसायाच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चहा, कॉफी आणि विविध प्रकारच्या शेकचा आस्वाद घेण्यासाठी तसेच मित्रपरिवारासोबत निवांत वेळ घालविण्यासाठी शहरात नव्या संकल्पनेतून सुरू झालेले हे दालन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या युवा उद्योजकांनी चिकाटी, मेहनत, दर्जेदार सेवा आणि ग्राहकांशी आपुलकीचे संबंध यांना प्राधान्य देत व्यवसायाची यशस्वी वाटचाल करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या शुभारंभप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाऊ अनुष्ठान, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, दगडू पवार सर यांच्यासह रामराज्य कोळी गल्ली मित्र परिवार, राम मंदिर चौक मित्र परिवार, पंचमुखी मित्र परिवार तसेच मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या व्यवसायाच्या माध्यमातून पारोळा शहरातील ग्राहकांना चहा, कॉफी आणि शेकचा दर्जेदार आस्वाद घेण्यासाठी एक नवे ठिकाण उपलब्ध झाले आहे. विकास भोई व शुभम राठोड यांच्या ‘मालक चहा – Coffee & Shake’ या नव्या व्यवसायाला उपस्थितांनी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
