Spread the love

गजानन महाराजांच्या जयघोषात जामठीतून शेगावकडे भाविक रवाना

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने जामठी दुमदुमले; ५० भाविकांचा भक्तिमय प्रवास

बोदवड : प्रतिनिधी – संदीप महाजन

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन जामठी येथून सुमारे ५० भाविक शेगावकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाले. एमएच १४ एनई ८२३७ क्रमांकाच्या बसमधून भाविकांनी शेगावच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी ‘गण गण गणात बोते’, ‘श्री गजानन महाराज की जय’ अशा जयघोषांनी जामठी परिसर दुमदुमून गेला.

जामठी येथून प्रस्थान करताना भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण होते. शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर झाले असून, या यात्रेचे नियोजन अनेक दिवसांपासून करण्यात आले होते. नियोजनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रवासादरम्यान भजन, नामस्मरण आणि गजानन महाराजांचा जयघोष करत भाविकांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले. श्रद्धा आणि उत्साहाने भारलेल्या या यात्रेमुळे जामठी ते शेगावचा प्रवासही भक्तिरसात रंगला.

शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकवून सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करणार असल्याचे भाविकांनी सांगितले. दर्शनानंतर पुन्हा गावात परतताना महाराजांचा आशीर्वाद घेऊन येण्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version