Spread the love

गाढोदे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प संपन्न

‘तथागत गौतम बुद्धांचे आरोग्यशास्त्र’ विषयावर डॉ. प्रा. सचिन नरवाडे यांचे मार्गदर्शन

जळगाव तालुका प्रतिनिधी :
गाढोदे (ता. जळगाव) येथे भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाले.

यावेळी आयु. डॉ. प्रा. सचिन नरवाडे (आयुर्वेद तज्ज्ञ तथा जिल्हा संरक्षण सचिव, जळगाव) यांनी ‘तथागत गौतम बुद्धांचे आरोग्यशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील साधी-सोपी उदाहरणे देत त्यांनी आरोग्य, आहार, जीवनशैली आणि निरोगी जीवन जगण्यासंदर्भातील विविध पैलू उपस्थितांना समजावून सांगितले. सहज, सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत केलेल्या मार्गदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास आयु. नी ज्योतिताई भालेराव (केंद्रीय शिक्षिका, जळगाव), आद. मीराबाई मा. नरवाडे, आद. वंदनाताई भिसे, आद. गौतम सपकाळे (बौद्धाचार्य), आद. आधारअण्णा सपकाळे (माजी श्रामणेर), आद. समिंदर सपकाळे (माजी श्रामणेर), आद. संतोष सपकाळे (माजी श्रामणेर), आद. हिरामण लटकन सपकाळे, आद. मधुकर भवानी सपकाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच गाढोदे महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षा आद. कविताताई सपकाळे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी, परिसरातील श्रद्धाशील बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राजेश इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयु. गौतम सपकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून धम्मविचार, आरोग्यदृष्टी आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश पोहोचत असल्याने परिसरातील उपासक-उपासिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version