Spread the love

पंचायत समिती पारोळा येथे स्वच्छता दिन उत्साहात साजरा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पारोळा/सुरेश पाटोळे (वार्ताहर) : महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पारोळा पंचायत समितीच्या पटांगणात २ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या संदेशासह स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.

महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला केवळ आरोग्याचा विषय न मानता निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार समाजाची मूलभूत गरज म्हणून महत्त्व दिले. याच विचारांना कृतीची जोड देत पंचायत समितीच्या पटांगणात स्वच्छता करणे, कचरा संकलित करणे तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कार्यालयीन परिसरात स्वच्छता राखावी आणि स्वच्छतेच्या उपक्रमात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

गांधी जयंतीच्या निमित्ताने नागरिकाभिमुख सेवा, स्वच्छता, स्वच्छ व सुंदर शहर तसेच लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

या अभियानास गटविकास अधिकारी भूषण कदम, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजीव सैदाणे, पद्माकर अहिरे, कक्ष अधिकारी किशोर पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता संदीप सोनवणे, कमलेश लोहार, वैशाली जडे, जागृती पाटील, भाग्यश्री कोठावदे, नेरकर मॅडम, राजेंद्र महाले, संजय शिंपी, मनरेगाचे APO आकाश भोई, विशाल मराठे, TPO पंकज पाटील, ऑपरेटर किशोर चव्हाण, ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, ग्रामरोजगार सहाय्यक अनिल पाटील यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version