Spread the love

रावेर परिसरात अवैध हातभट्टी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई

८१ हजार रुपयांचे कच्चे-पक्के रसायन व हातभट्टी दारू नष्ट; अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

रावेर | प्रतिनिधी : रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ८१ हजार रुपये किमतीचे कच्चे-पक्के रसायन, हातभट्टी दारू व साहित्य नष्ट केले. पाल व अंजदा बिट परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाल बिट परिसरात गुळ-मोह मिश्रित ३० लिटर उकळते रसायन आणि ४० लिटर कच्चे रसायन, असा एकूण अंदाजे २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. तसेच कृष्णा मधुकर राठोड (वय २७, रा. पाल, ता. रावेर) याच्याकडून १५ लिटर गावठी हातभट्टी दारू, अंदाजे १,५०० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली.

अंजदा बिट परिसरात सुपडू भिवसन तायडे (रा. नेहता, ता. रावेर) याच्याकडून ३० लिटर गावठी हातभट्टी दारू, गुळ-मोह मिश्रित १०० लिटर कच्चे रसायन व १५० लिटर पक्के रसायन, असा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी सदर कच्चे व पक्के रसायन तसेच हातभट्टी दारू व निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जागेवरच नष्ट केले. रावेर परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या आदेशानुसार एपीआय अमूल बच्छाव, पीएसआय मनोज महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख तसेच डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version