Spread the love

एरंडोलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा शिबिर उत्साहात

ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन; तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम

एरंडोल | प्रतिनिधी : तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दत्त कॉलनी, एरंडोल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्क, अधिकार आणि उपलब्ध विधी सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी एरंडोल न्यायालयाचे न्यायाधीश कुर्हाडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी निकम साहेब होते. यावेळी गुरव साहेब, भालेराव सर यांच्यासह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन

एरंडोल येथील रिटेनर अॅड. मधुकर बी. देशमुख, अॅड. प्रतिभा पाटील, अॅड. जयेश पिलोरे, तसेच पीएलव्ही मा. अग्रवाल सर, पंढरीनाथ मोरे, हर्षदा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या विविध कायदेशीर अडचणींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच उपलब्ध विधी सेवा आणि कायदेशीर मदतीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण माळी सर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच अॅड. जे. जी. पाटील सर उपस्थित होते. शिबिरास एरंडोल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अॅड. मधुकर बी. देशमुख यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर हक्कांविषयी जागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version