कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. शीतल महाजन यांची बिनविरोध निवड
एकमेव उमेदवारी अर्ज दाखल; मावळत्या उपसरपंच ज्योती महाजन यांनी सोपविला पदभार
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ : भडगाव तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. शीतल कपिल महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी शीतल महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जितेंद्र लोणीया यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर मावळत्या उपसरपंच सौ. ज्योती महाजन यांनी नवनिर्वाचित उपसरपंच शीतल महाजन यांच्याकडे पदाचा पदभार सुपूर्द केला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले.
यावेळी सरपंच सौ. कविता सोनवणे, सौ. ज्योती महाजन, सौ. प्रमिला पाटील, सौ. सुनंदा माळी, सौ. वंदना शिवदास भिल्ल, सौ. सीमा संदेश महाजन, श्री. रूपचंद महाजन, श्री. रोहिदास पाटील, श्री. शुभम ठाकरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक पाटील व श्री. विजय केदार सर यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रातूनही अभिनंदन
नवनिर्वाचित उपसरपंच शीतल महाजन यांचे पती श्री. कपिल महाजन सर हे किसान शिक्षण संस्थेच्या वडजी येथील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब प्रताप हरी पाटील तसेच संस्थेच्या सचिव ताईसौ. पूनमताई प्रशांत पाटील यांनी कपिल महाजन सर व नवनिर्वाचित उपसरपंच शीतल महाजन यांचे अभिनंदन केले.
ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
निवडीच्या प्रसंगी ग्रामपंचायत कोळगाव नम्रता पॅनलचे प्रमुख श्री. श्याम पाटील सर यांच्यासह श्री. पितांबर पवार, श्री. कौतिक सोनवणे, श्री. गोविंदराव अमराव महाजन, श्री. कपिल महाजन सर, श्री. रविंद्र बोरसे सर (बहाळ), डॉ. अनुप पाटील, श्री. प्रल्हाद रंगराव पाटील, श्री. संदीप हिम्मतराव महाजन, श्री. जिभाऊ मालजी पाटील (पिप्रिहाट), श्री. गोपाल नाना माळी, श्री. दिलीप पाटील सर, श्री. सुभाष मोतीराम पाटील, श्री. बापू सखाराम पाटील, श्री. शिवाजी सोनवणे, श्री. आत्माराम ठाकरे, श्री. प्रदीप महाजन, श्री. भरत पाटील, श्री. सुनील पाटील, श्री. सुभाष जयराम माळी, श्री. देवेंद्र राजेंद्र पाटील, श्री. बापू गोविंदा पाटील, श्री. एकनाथ अभिमान महाजन, श्री. आनंदा महाजन, श्री. प्रमोद महाजन, श्री. चिंधा फकीरा माळी, श्री. राजेंद्र जयराम पाटील, श्री. सावता रामदास महाजन, संदेश महाजन सर, गोविंदा तुकाराम माळी, योगेश सैदाणे, हेमंत महाजन, रामदास पाटील, श्री. रवींद्र दशरथ माळी, श्री. श्याम राजेंद्र माळी, श्री. योगेश साहेबराव महाजन, श्री. दिनेश पाटील, श्री. अंकुश कौतिक सोनवणे, श्री. शिवशंकर महाजन, श्री. पांडुरंग माळी, अनिल बिऱ्हाडे, भीमराव महाजन, प्रवीण महाजन, हेमंत घोडके, श्री. गुलाबराव महाजन, श्री. संजय जाधव, श्री. साहेबराव कोळी, श्री. योगेश महाजन, श्री. समाधान माळी, श्री. रोहित माळी, श्री. जितू गोसावी, श्री. बापू पवार, श्री. दिनेश माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी सौ. शीतल महाजन यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
