संघरत्न सपकाळे राज्य पत्रकार संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष यांचे कार्यकारी अभियंतांना निवेदन.
भुसावळ प्रतिनिधी : पूजा कॉम्प्लेक्स परिसर पांडुरंग नाथ नगर तसेच संपूर्ण भुसावळ शहरात झिरो लोड च्या नावाखाली वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येत आहे. हा परिसर शिवाजीनगर युनिट च्या अंतर्गत येतो. पूजा कॉम्प्लेक्स परिसर तसेच पांडुरंगनाथ नगरातील सर्व वीज ग्राहक हे नियमित वीज भरणा करतात असे असून देखील वारंवार परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना तसेच वयोवृद्धांना होणारा त्रास रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे चोरीच्या घटना घडल्यास त्याची जबाबदारी कुणाची…?
या संदर्भातील निवेदन राज्य पत्रकार संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे यांच्या वतीने कार्यकारी अभियंता सोनावले यांना देण्यात आले.
या आपल्या महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक हा त्रस्त झाला आहे. जर आपण झिरो लोड शेडिंग च्या नावाखाली ही मनमानी करत असाल तर तशा पूर्व सूचना ह्या वीज ग्राहकांना देत नाही. मुळातच जर झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली आपण जर वीज वारंवार बंद करत असाल तर तसे आपण सर्व वीज ग्राहकांना कळविले पाहिजे किंवा वृत्तपत्रांमध्ये तशी सूचना दिली पाहिजे..
तसे न करता आपण आपल्या मनात येईल तेव्हा रात्री अपरात्री वीजपुरवठा बंद करण्यात येतो आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना कारण विचारतो तेव्हा तुमचे अधिकारी सांगतात वरतून बंद करण्यात आला आहे. वरतून ई-मेल आला आहे.
हा आपला चाललेला मनमानी कारभार जर बंद नाही झाला तर येणाऱ्या काळात मोठे जन आंदोलन उभारावे लागेल याची कृपया आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. आणि हे झिरो लोड शेडिंगचे भूत आणखी आमच्या भुसावळ शहरात किती दिवस चालणार आहे याची स्पष्ट माहिती स्थानिक वृत्तांत पत्रांमध्ये किंवा भुसावळ शहरातील सर्व वीज ग्राहकांना देणे आपल्याला बंधनकारक आहे हा मनमानी कारभार त्वरित थांबवावा .
