Spread the love

झुरखेडा येथे ६८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कर्जबाजारीपणा व दुष्काळी परिस्थितीमुळे चिंतेत असल्याची प्राथमिक माहिती; धरणगाव पोलिसांकडून मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू

झुरखेडा, ता. धरणगाव, प्रतिनिधी : झुरखेडा (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी संतोष गोबा चौधरी (वय ६८) यांचा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे झुरखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष चौधरी हे शेती व्यवसाय करीत होते. कर्जबाजारीपणा आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ते चिंतेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये ही घटना घडली.

घटनेनंतर त्यांना तातडीने धरणगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांकडून तपास सुरू

संतोष गोबा चौधरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन पाटील करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version