Spread the love

धुळ्यात ४५ फुटांच्या रावणाचे होणार दहन; कीर्तनाचा कार्यक्रमही रंगणार!

चितोड नाका परिसरात आयोजन; रावण दहन सोहळ्याच्या तयारीसाठी भूमिपूजन संपन्न, नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरात दसऱ्यानिमित्त यंदाही ४५ फुटांच्या भव्य रावणाचे दहन करण्यात येणार आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा हा सोहळा यंदा जय मल्हार मित्र मंडळ, मनोज पिसे मित्रपरिवार आणि मिल परिसराच्या वतीने चितोड नाका, २८ नंबर शाळा व ध्वज चौक परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने रावण दहन सोहळ्याचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमांतर्गत सायंकाळी ७ वाजल्यापासून ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करता येणार असून, त्यानंतर ४५ फुटांच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

धुळे शहरातील नागरिकांनी आणि भाविकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक मनोज अण्णा पिसे यांनी केले आहे.

भूमिपूजनप्रसंगी मनोज पिसे, गौतम पगारे, विकास बाबर, तुषार नवले, वसंत जुंबळ, विनोद जगताप, मनोज ढवळे, जितू ईखे, शशी मोगलाईकर, राजू सुपनर, वाल्मीक जाधव, दादा कढरे, गुलाब सुपनर, कृष्णा शिंदे, प्रशांत साथमोहन, प्रणव वाघमोडे, दीपक साळे, विनोद भोपे, दिनेश गायकवाड, नाना साळवे आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version