शिवाजी केशव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन
धरणगावच्या गुजराथी गल्ली परिसरात शोककळा; गुरुवारी सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा
धरणगाव, प्रतिनिधी : शहरातील गुजराथी गल्ली येथील रहिवासी शिवाजी केशव चव्हाण यांचे बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
स्व. शिवाजी केशव चव्हाण यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. धरणगाव येथील मार्केट कमिटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शोकाकुल परिवार : भीमराव केशव चव्हाण, चंद्रकांत भीमराव चव्हाण, प्रसाद शिवाजी चव्हाण, भावेश शिवाजी चव्हाण, भूषण पाटील (जावई) व समस्त चव्हाण परिवार.
भावपूर्ण श्रद्धांजली!
