Spread the love

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दुधगाव येथे बजावला मतदानाचा हक्क

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक; लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित

जिंतूर | प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दुधगाव (ता. जिंतूर) येथे मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक मत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मतदानाच्या माध्यमातून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळे मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचा जाणीवपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.

विकसित महाराष्ट्र, सुशासन आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version