Spread the love

महर्षी भगवान वाल्मिकी जयंतीनिमित्त पुण्यात विनम्र अभिवादन!

राजीव गांधी वाचनालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वाहिली आदरांजली

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

आद्यगुरू आणि आद्यकवी महर्षी भगवान वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने पुण्यातील ससून कॉलनी येथील राजीव गांधी वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महर्षी भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सुधीर दादा जयंती, पुणे शहर कॅन्टोन्मेंट विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेश जाधव आणि बाबूजी बेद यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महर्षी भगवान वाल्मिकी यांनी आपल्या साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीला महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला महेंद्र लालबिगे, मुकेश भाई चव्हाण, ससून पंचायतीचे पंचप्रमुख देवदास कसोटीया, बलरामजी लखन, शैलेंद्र चव्हाण, विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त कनव भाई चव्हाण, ‘हॅपी टू हेल्प’ संस्थेचे कुणालजी करोते, मनोज निंदाने, संतोष चव्हाण, परेश चव्हाण, प्रणव निनारीया, जगदीश चव्हाण आणि हेमराज साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ससून व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी पतसंस्थेचे संचालक प्रमोद निनारीया आणि माजी स्वीकृत नगरसेवक तथा राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विनोद निनारीया यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version