सुनील सोनवणे यांची धरणगाव शहर काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती!
जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव येथील सुनील माणिक सोनवणे यांची धरणगाव शहर काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक कार्यात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मौलाना मुक्ती हारून नकवी आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप भैया पाटील यांच्या आदेशानुसार, तसेच जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव आणि अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
सुनील सोनवणे यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे, ज्येष्ठ नेते सुरेश भागवत यांच्यासह धरणगाव शहर व तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून सुनील सोनवणे पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमाती सेलच्या कार्याला गती देण्यासाठी सक्रिय योगदान देतील, अशी अपेक्षा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
