Spread the love

कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती!

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे; महिला कार्यकारिणी सदस्यपदी रत्ना कंखरे यांची निवड

धरणगाव | वाल्मिक पाटील

कास्ट्राइब संघटनेच्या आगामी राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथे आयोजित कॉर्नर सभेत संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे, तर महिला कार्यकारिणी सदस्यपदी रत्ना कंखरे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

या सभेत जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बागुल आणि सल्लागार रमेश सोनवणे यांनी संघटनात्मक कार्य, कर्मचारी व शिक्षकांचे प्रश्न तसेच आगामी अधिवेशनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

सभेत दगडू सूर्यवंशी, भूपेंद्र बाविस्कर, किशोर म्हस्के आणि महादू अहिरे यांनीही विविध विषयांवर आपले विचार मांडले. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

कैलास पवार यांची कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक, सहकारी, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विनायक बैसाणे आणि रत्ना कंखरे यांनाही त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version