Spread the love

संत आसाराम बापूंना वैद्यकीय जामीन द्या; योग वेदांत समितीची मागणी!

८७ वर्षीय आसाराम बापूंच्या उपचारांसाठी पॅरोल देण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन

धुळे | प्रतिनिधी

संत आसाराम बापू यांना वयाच्या ८७व्या वर्षी वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने जामीन किंवा पॅरोल मंजूर करण्यात यावा, अशी मागणी योग वेदांत सेवा समिती आणि आसाराम बापूंच्या अनुयायांनी केली आहे. या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी आणि भक्तांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.

आयुर्वेदिक उपचारांसाठी वैद्यकीय जामिनाची मागणी

आसाराम बापू गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांचे वय आणि आरोग्य लक्षात घेता, माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी वैद्यकीय जामीन किंवा पॅरोल मंजूर करावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

आसाराम बापूंच्या उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अनुयायांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या मागणीवर संबंधित यंत्रणांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहनही करण्यात आले.

समितीचे पदाधिकारी व भक्तांची उपस्थिती

यावेळी योग वेदांत सेवा समितीचे गजेंद्र जगदाळे, किशोर चौधरी, ज्ञानेश्वर मान, किशोर अहिरे, अर्जुन गवळी, भगवान रेलन, वाल्मीक आग जाळे, संतोष साहू, रवींद्र कापडे, पुनम ठाकूर, शोभा कापडे, उषा परदेशी, माया कदम, शोभा सदाणे, सुरेखा वानखेडेकर, लिलाबाई बाविस्कर, मंगला फटकाळ, जयश्री चौधरी, सुनिता सोनवणे, त्रिवेणी विसपुते, अनिता मराठे आणि दर्शना लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने आसाराम बापूंचे अनुयायी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version