Spread the love

भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील १९ गावांतील पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर!

उपविभागीय कार्यालयातील तापी सभागृहात चिठ्ठीद्वारे सोडत; लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आले आरक्षण

भुसावळ | संघरत्न सपकाळे

भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील पोलीस पाटील पदांच्या रिक्त असलेल्या १९ जागांसाठी आरक्षण सोडत गुरुवारी, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात आली. भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात ही सोडत पार पडली. लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीष वखारे, नायब तहसीलदार विनंते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१९ गावांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण

तीन तालुक्यांतील पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत महत्त्वाची मानली जात आहे. सोडतीनंतर जाहीर झालेले गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती : धानोरी, पंचाणे, विल्हाळे

अनुसूचित जाती महिला : मानपूर, वरखेड खुर्द

अनुसूचित जमाती : जोगलखोरी, निंभोरा बुद्रुक, सावतर

अनुसूचित जमाती महिला : पळासखेडा खुर्द, राजुरा

इतर मागास प्रवर्ग : जलचक्र बुद्रुक, अजनसोंडे

इतर मागास प्रवर्ग महिला : रेवती

भटक्या जमाती (ब) : डोलारखेडा

भटक्या जमाती (क) : कासारखेडा

भटक्या जमाती (क) महिला : वराड खुर्द

विशेष मागास प्रवर्ग : पिंप्रीसेकम

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) : भोकरी

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) : भानखेडा

आरक्षण सोडत जाहीर झाल्याने संबंधित गावांमध्ये पोलीस पाटील पदाच्या भरती प्रक्रियेबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version