Spread the love

‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न’ पुरस्कारप्राप्त रामचंद ढाके यांचा भुसावळमध्ये भव्य सत्कार

तापी नदीकाठच्या श्री भगवान परशुराम मंदिरात शाल-श्रीफळ देऊन गौरव; पुरस्कारामुळे भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा

भुसावळ | प्रमोद पाटील, प्रतिनिधी

भुसावळ शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी रामचंद ढाके यांना प्रतिष्ठेचा ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भुसावळ येथे त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तापी नदीच्या किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिरात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भुसावळ शहरप्रमुख गणेश चौधरी (सोनवणे), बल्लाळेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी आणि ठाकूर परिवार यांच्या वतीने रामचंद ढाके यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

रामचंद ढाके यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने भुसावळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे शहराचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मान्यवरांनी ढाके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार सोहळ्याला शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख गणेश चौधरी, बल्लाळेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी, समाजसेवक कैलास चौधरी, समाजसेवक विनोद चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख भारत रडे, शिवसेना उपशहरप्रमुख अमोल भालेराव, विशाल अत्रे, नितीन कोळी, निखिल कुरकुरे, गजानन सोनार, अथर्व उपासनी, थर्वेश किरंगे यांच्यासह मित्रमंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version