Spread the love

ज्येष्ठ शिक्षक जयदीप पाटील यांना ‘महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

पंढरपूर येथे १६ व्या राष्ट्रीय शिक्षक परिषदेत सपत्नीक गौरव; मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जयदीप पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या १६ व्या राष्ट्रीय परिषदेत त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची १६ वी राष्ट्रीय परिषद शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पंढरपूर येथे उत्साहात पार पडली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत इंदूर येथील होळकर संस्थानचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते जयदीप पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत जयदीप पाटील यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाल्याने पाचोरा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, शिक्षकवर्गातूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या परिषदेला काँग्रेस कमिटी सहकार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ॲड. शुभांगी शेरेकर, प्रबोधनकार ह.भ.प. संतसेवक बंडोपंत महाराज ढाकणे, परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. रवींद्र चव्हाण, सौ. जयश्री चव्हाण, सौ. नूतन पाटील, कु. किरण पाटील, डॉ. पंकज शिंदे, गुणवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेकडून अभिनंदन

जयदीप पाटील यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराजे पवार, सेक्रेटरी सौ. रुपालीताई जाधव पवार तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version