धुळे – मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या , शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाडण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना शिंदे गटांसह शायना एन सी ज्यांच्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. धुळ्यातल्या महाराणा प्रताप चौकात शायना एनसी यांच्या पोस्टरला जोडे मारत, पोस्टर फाडत ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
एका विषया संबंधित मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विवादित पुस्तक फाडण्याऐवजी शायना एन्सी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाढण्यात आला. त्यामुळे मुंबई सह महाराष्ट्रभरात शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात ठाकरे गटासह विविध पक्षांनी व्यक्त करत आंदोलन केले आहे. धुळ्यात देखील शिवसेना कार्यालयातून शायना एनसी यांचे पोस्टर नेत महाराणा प्रताप चौकात जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना गर्भित इशारा दिला आहे.
