Spread the love

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या अवमानप्रकरणी शायना एनसी यांचा शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध!

शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त; शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची भूमिका

जळगाव : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शायना एनसी यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान ही शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी घटना असून, अशा प्रकारांचे समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिका यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. मराठी माणसाचे हक्क, हिंदुत्व आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव राहिला आहे. अशा लोकनेत्यांच्या छायाचित्राचा अवमान होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, सार्वजनिक जीवनात वावरताना महापुरुष आणि लोकनेत्यांविषयी आदर राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मनीषा पाटील, माजी नगरसेविका पार्वता भील, विभागप्रमुख किरण भावसार, शरीफ रंगरेज, बापू मेने, किरण ठाकूर, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील, सुनीता सपकाळे, रुचिका सपकाळे, शोभा महाजन, अरुणा घुगे, ज्योती घुगे, वैशाली शिंपी, सुरेखा कोळी, दीपाली घुगे, रेखा पाटील, संगीता पाटील, सिंधू शिंदे, सरला सोनार, अनिता मांडवे यांच्यासह शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version