संभाजीनगर : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येत सहकार क्षेत्रात आपली प्रभावी छाप उमटवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संभाजीनगर येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संभाजीनगर येथील प्रा. योगेशजी मालचे सर, जनसम्राट टाइम्सचे मुख्य संपादक मुकुंदराव नन्नवरे, जगदीश सपकाळे आणि मित्र परिवाराच्या वतीने नामदार गुलाबराव पाटील साहेब यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानली जाते. अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड होणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. या यशातून गुलाबराव पाटील यांचे राजकीय नेतृत्व, जनसंपर्क आणि सहकार क्षेत्रातील वाढते महत्त्व अधोरेखित होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही नेतृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, आपल्या नेतृत्वशैलीतून आणि व्यापक संपर्कातून त्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गुलाबराव पाटील साहेब यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
