संघटनेच्या पाठपुराव्याला यश; धुळे रुग्णालयातील १६० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप!
२०२६ ते २०२८ या कालावधीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन शर्ट व तीन पॅन्ट; अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांच्या हस्ते वितरण
धुळे : शासनमान्य महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय मुंबई या संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १६० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी हा वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
रुग्णालयाचे माननीय अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन शर्ट आणि तीन पॅन्ट देण्यात आल्या. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांना गणवेश उपलब्ध झाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय गिरीश भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असून, गणवेश वितरण हा त्यातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राज्य विभागीय अध्यक्ष श्रीमती सरलाबाई शिरसाट, धुळे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल वाघ, जिल्हा सचिव श्री. नंदकिशोर अबेरे, जिल्हा खजिनदार श्री. संजय खैरनार, लिनन कीपर श्री. दीपक बेडसे, श्री. अविनाश ऐडके, श्री. साहेबराव सोनवणे, श्री. प्रवीण चव्हाण, श्री. अज्जू लोखंडे, श्री. सूरज पवार, श्री. देवा चावरे, श्री. सोमनाथ बळसाने, श्री. बाळू जोगदंड, श्री. हितेश दुरले, श्री. दिनेश पवार, श्री. जय चंडाले, श्री. त्र्यंबक वैराळ, श्री. महेश सोनार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संघटनेच्या पाठपुराव्यामुळे १६० कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा उपक्रम कर्मचारी हितासाठी संघटनेच्या कार्याची सकारात्मक फलश्रुती ठरला.
