विरोधी पक्ष नेत्यांच्या हस्ते पालखीची मिरवणूक, अन्नदान संपन्न….
धुळे – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आई एकवीरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विरोधी पक्षनेते दीपक खोपडे यांना पालखी उचलण्याचा मान देण्यात आला. मंदिर परिसरातून पालखी मिरवणूक संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या आवारातच अन्नदानाच वितरण करण्यात आलं. यावेळी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी एकवीरा देवी मंदिरात सुरुवात करण्यात आली तर सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.
त्रिपुरारी अर्थातच कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं पहाटे पाच वाजता दुग्धाभिषेक, महाआरती करत दुपारी बारा वाजेनंतर मंदिराच्या परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. विरोधी पक्षनेते दीपक खोपडे यांच्यासह संजय अंपळकर यांना देवीची पालखी उचलण्याचा मान देण्यात आला. मंदिराच्या आवारात ढोल ताशाचा गजरात पालखी मिरवणूक संपन्न झाल्यानंतर एकवीरा देवीची महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. तर सायंकाळी भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दीपोत्सवा सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी केले आहे.
