Spread the love

धुळे – विविध प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांनी मनपायुक्तांकडे धाव घेतली आहे. मात्र आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या सफाई कामगारांना प्रवेशद्वारावरच रोखल्याने सफाई कामगारांनी आयुक्तांच्या दालना बाहेरच ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी शिष्टमंडळाने उपयुक्त हेमंत निकम यांची भेट घेतली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास सहा डिसेंबर पासून काम बंद करण्याचा इशारा सफाई कामगारांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. यावेळी शेकडोंच्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते.

सफाई कामगार संघटनेने पाच प्रमुख मागण्या सफाई कामगारांच्या मनपा आयुक्तांसमोर ठेवल्या आहे. यात 1) दिवसातून चार वेळा होणारी हजेरी दोन वेळेस करावी, 2) 2016 ते 2026 या कालावधीतील शासकीय सुट्ट्यांचा पगार तात्काळ कर्मचाऱ्यांना द्या, 3) मनपाचे विविध कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा सफाई चे काम द्या, 4) सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी लागू करा, 5) त्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन काळातील पगार तात्काळ अदा करा या प्रमुख मागण्यांसाठी सफाई कामगारांनी यलगार पुकारला आहे. मागण्या मान्य न झाल्यास सहा डिसेंबर पासून काम बंद करण्याचा इशारा सफाई कामगारांनी मनपाला दिला आहे. यावेळी सफाई कामगार नेते विजय पवार, नागेश कंडारे, बापू खरात, किशोर मोरे यांच्यासह सफाई कामगार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version