Spread the love

अनाथ व विशेष गरजा असलेल्या मुलींना अन्नदान; अविष्कार भुसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा!

युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांच्या पुढाकारातून उपक्रम; बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारणाच्या शिकवणीला अभिवादन

धुळे : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या शिकवणीचा आदर्श समोर ठेवत युवासेनेच्या वतीने अविष्कार भुसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणा टाळून अनाथ व विशेष गरजा असलेल्या शेकडो मुलींना अन्नदान करण्यात आले.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलींच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते मुलींना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना वाढदिवसाचा कोणताही मोठा गाजावाजा न करता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या विचारांना अभिवादन करत युवासेनेने हा उपक्रम राबविला. अशा उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. युवासेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, अमित खंडेलवाल, अमित खोपडे, नितीन मराठे, अजय पाटील, भूषण पाटील, चेतन धामेच्या, संस्कार मतिमंद शाळेचे सुनील वाघ, राहुल ठाकूर, नितीन धनगर, आकाश मराठे, अनिल ठाकूर, गोपी शर्मा यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version