Spread the love

उद्योग मंत्री उदय सामंत व डॉ. नीलम गोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

पुणे (शंकर जोग) : पुण्यातील शिवसेना भवन, सारसबाग येथे ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’ तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात शिवसेना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा ‘धर्मवीर आनंद दिघे पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात डॉ. नीलम गोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात कामगिरीबद्दल अनिल गडकरी, सामाजिक व नागरी प्रश्नांवर कार्य केल्याबद्दल निलेश जगताप, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल राजाभाऊ भिलारे, रक्तदान चळवळीत सातत्याने कार्य करणारे प्रकाश ढमढेरे, खेळाडूंना प्रोत्साहन देणारे शंकर संगम तसेच पक्ष संपर्क क्षेत्रातील कार्याबद्दल अनिल बटाने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक व राज्य कक्ष प्रमुख वैभव वाघ यांनी केले होते. उद्घाटन सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिव कामगार सेना प्रदेश अध्यक्ष सुधीर कुरुमकर, आबा बागुल, सचिन मामा थोरात, सुनील जाधव, प्रमोद प्रभुणे, विश्वास दिघे, सागर घोलप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला असून, नागरी समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version